नैराश्यातुन माणूसपणाकडे असा माझा समृद्ध वाचन प्रवास

मोईन हुमॅनिस्ट यांचे प्रतिपादन
वाचन प्रेरणा दिनी अद्वैत फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्गसह राज्यातील वाचनप्रेमींचा बुलढाण्या तील मोईन शी सुसंवाद
“एक वाया गेलेला.. जुगाराच्या नादी लागून हळूहळू नैराश्याच्या अधीन झालेल्या माझ्या सारख्या मुलाच्या आयुष्यात पुस्तके आली आणि माझं आयुष्य 360 अंशात बदललं. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ हा सिनेमा मी पाहिलं आणि आयुष्यातील पहिलं दहा रुपयांचा पुस्तक मी खरेदी केलं ते म्हणजे ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र’ त्या पुस्तकाचा आयुष्यात प्रवेश झाला आणि नैराश्यातून माणूसपणाच्या दिशेने माझा समृद्ध प्रवास सुरु झाला.” असे प्रतिपादन बुलढाणा येथील वाचन प्रेमी ‘मोईन ह्यूमॅनिस्ट’ यांनी अद्वैत फाऊंडेशन आयोजित ‘वाचन प्रेरणा दिना निमित्त ऑनलाइन आयोजित ‘वाचक संवाद’ मध्ये बोलताना केले.
अद्वैत फाऊंडेशन , कणकवलीच्या अध्यक्षा सरिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑनलाइन संवाद एका वाचन वेड्याशी’ हा कार्यक्रमा वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित केला होता. या ऑनलाइन संवादात मोईन हुमॅनिस्ट याच्या सोबत महाराष्ट्र भरातील वाचन प्रेमींनी सहभाग नोंदवला.
बुलढाणा जिल्ह्यातील सुल्तानपूर गावी राहणाऱ्या मोईन हुमॅनिस्ट हे पुस्तकांच्या दुनियेतील एक अवलिया ! वाचन हाच ध्यास आणि श्वास बनलेल्या मोईन याना साहित्यिक शरद तांदळे यांनी ‘स्वप्नील कोलते साहित्यिक पुरस्कार’ हा वाचकांसाठी दिला जाणारा पहिलाच पुरस्कार देऊन गौरविले. मोईन यांचे वाचन केवळ स्वतःपूरते मर्यादित नसून आपण जे वाचलं आहे ते सर्वांपर्यंत पोचव यासाठी ते वाचलेल्या पुस्तकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिप्राय लिहून तो सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवतात. त्यांच्या या उपक्रमामुळे देशभरातील सुजाण वाचकांची एक मोठी साखळी तयार झालीय.
सोबतच ते अनेक नामांकित प्रकाशनांची पुस्तके वाचकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतात.
मोईन यांनी त्यांचा राहत्या घरी उभारलेला ‘स्टडी बंकर’ आज अनेक वाचक प्रेमींसाठी जणू तीर्थक्षेत्र बनले आहे
वाचनाची आवड, वाचण्याचे फायदे, वाचनामुळे विस्तारलेला लोकसंग्रह, आयुष्याकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन , वाचन संस्कृती वाढी साठी काय करावं, मुलांनी वाचन कस वाढवावं अशा विविध मुद्द्यांचा अनुषंगाने वाचकांनी यावेळी मोईन याना प्रश्न विचारले आणि मोईन यांनी सुद्धा त्यावर मोकळेपणाने उत्तरे देत प्रश्नोत्तरांचे सेशन दर्जेदार केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु संजना परब हिने केले. प्रास्ताविक कु संघवी जाधव हिने तर आभार प्रदर्शन कु विधी चिंदरकर हिने केले. तांत्रिक साहाय्य रुपेश गिरा यांनी केले.
कणकवली, प्रतिनिधी





