विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली मध्ये वाचन प्रेरणादिन व ग्रंथप्रदर्शन

कणकवली/मयुर ठाकूर

दि . १५ ऑक्टोबर डॉ.ए.पी .जे अब्दूल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ग्रंथालय विभागामार्फत विद्यार्थांना वाचनाची अभिरूची निर्माण होण्यासाठी वाचन प्रेरणा व ग्रंथ प्रदर्शन हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला . या प्रसंगी जेष्ठ रंगकर्मी व अष्टपैलू अभिनेता . भारदार सूत्रसंचालक / निवेदक मा . निलेश पवार साहेब प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमाचे उद्‌गाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे . कांबळे सर व माजी शिक्षिका सौ श्रध्दा कदम मॅडम यांनी केले . यावेळी मा . निलेश पवार यांनी वाचन शक्तीचे महत्व आणि विकास या संबंधी आपल्या भारदस्त आवाजाच्या शैलीत विद्यार्थांना मार्गदर्शन केले वाचनाची अभिरुची बालवयातच कशी रुजते याची विविध उदाहरणे देऊन विवेचन केले प्रविण दवणे यांच्या कथेचे कथा कथन निलेशजी पवार यांनी करून बालकांना आणि अध्यापकांना मंत्रग्ध केले . त्यांच्या मार्गदर्शनामुळे वाचन शक्ती विकसित होण्यास प्रशालेतील विद्यार्थांना चालना मिळाली . यावेळी श्री संदिप कदम ‘ सौ श्रध्दा कदम यांनी वाचन विकास आणि व्यक्तीमत्व याविषयी मार्गदर्शन केले तसेच विज्ञान शिक्षिका सौ केळुसकर मॅडम यांनी स्वरचित कवितांचे प्रकटवाचन करून श्रोत्यांची दाद मिळविली आणि स्वतः चा वाचनातून विकास कसा झाला व त्यांच्या कवितेचा जन्म या विषयी स्वकथन केले . मुख्याध्यापक पी.जे कांबळे सरांनी वाचनशक्ती व प्रेरणा या विषयी उद्बोधन केले . या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन प्रशालेचे ग्रंथपाल . श्री महानंद पवार यांनी केले . ग्रंथालय विभागामार्फत हस्ताक्षर स्पर्धा घेऊन विजेत्यांना ग्रंथ भेट दिली . वाचन दिना निमित्ताने प्रशालेच्या ग्रंथालयाला वाचनाची वृद्धी होण्यासाठी श्री विध्नेश गोखले ‘ श्री माऊली बुक डेपो ‘ श्री गोवेकर श्री म्हापसेकर या मान्यवर व्यक्तीनी ग्रंथालयाला ग्रंथांची भेट देणगी देऊन उपकृत केले . या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पर्यवेक्षिका सौ जाधा केंद्रप्रमुख श्री पवार जेष्ठ शिक्षक श्री वणवे उपस्थित होते .

error: Content is protected !!