कणकवली कॉलेजमध्ये मंगळवारी युवा महोत्सव

कणकवली/मयुर ठाकूर

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मंगळवारी दिनांक १७ ऑक्टोबर रोजी कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या युवा महोत्सवांमध्ये लोकनृत्य, एकेरी नृत्य, निबंध, वक्तृत्व, वाद-विवाद, समूह नृत्य, गायन, रांगोळी, पोस्टर मेकिंग, मेहंदी, पेंटिंग अशा विविध कला प्रकारांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ,त्यांच्यात कलात्मक विकास व्हावा, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
विजयी स्पर्धकांना तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. महोत्सव प्रसंगी महाविद्यालयाच्या माजी विदयार्थी कालावंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाचे सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहामध्ये होणार आहे. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, विशेष मानद अधिकारी डॉ. संदिप साळुंखे व सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
तरी या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. अरुण चव्हाण व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले आहे.

error: Content is protected !!