कणकवली बेळणे मधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेनमध्ये
भाजपचे माजी उपसरपंच देखील शिवसेनेत
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले प्रवेश कर्त्यांचे स्वागत
कणकवली तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने तालुक्यात पक्ष वाढीच्या दृष्टीने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, गेले काही दिवस कणकवली तालुक्यात तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक गावांमध्ये शिवसेना पक्ष प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. नुकताच कणकवली तालुक्यातील बेळणे मधील शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये विलास करांडे, सचिन चाळके, दीपक चाळके, सुमन मुणगेकर, प्रणय तांबे, उपसरपंच दिलीप तांबे, लक्ष्मण चाळके, अंकुश चाळके, विष्णू तोडणकर, अण्णा गुरव, विनोद डगरे, शैलेश चाळके, आदिनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, विधानसभा प्रमुख संदेश पटेल, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली