दाभोलीनाका नवदुर्गेचे राजन तेली यांच्या हस्ते सपत्नीक पुजन

मातोश्री कला क्रीडा मंडळ यांचे आयोजन

विविध सांस्कृतिक कार्यक्रम

रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी : मातोश्री कला क्रीडा मंडळ, दाभोलीनाका वेंगुर्ले च्या वतीने दरवर्षी नवरात्रौत्सवात नवदुर्गेचे पुजन केले जाते. तसेच दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते देवीचे पूजन केले जाते. त्यावर्षी मंडळाच्या वतीने प्रथम पुजेचा मान भाजपा नेते व माजी आमदार राजन तेली यांनी सपत्नीक पुजन केले. मंडळाचे हे २८ वे वर्ष असून, वेंगुर्ले तालुक्यातील सर्वात पहिला नवरात्रौत्सव या मंडळाने सुरू केल्यामुळे जिल्ह्यात या मंडळाचा नावलौकिक आहे.
दरवर्षी नवरात्रौत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते , यामध्ये भजन , दशावतार , विविध स्पर्धा, महीलांची फुगडी, नाटक, ऑर्केस्ट्रा, होम मिनिस्टर, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम या मंडळा मार्फत राबविण्यात येतात.
दिनांक १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत हा नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीचे पूजन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने राजन तेली यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दादा कुबल, नवरात्रौत्सव समिती उपाध्यक्ष उपेंद्र तोटकेकर, प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, वसंत तांडेल, सुहास गवंडळकर, सुनील डुबळे, संदेश निकम, जयंत मोंडकर, शरद मेस्त्री, पुरोहित – श्रीकांत रानडे व राघवेंद्र जोशी, तुषार साळगांवकर, रमेश नार्वेकर, नंदु जुवलेकर, प्रमोद वेर्णेकर, रविंद्र शिरसाठ, भुषण आंगचेकर, भुषण सारंग, सुधिर डिचोलकर, भानुदास मांजरेकर, अविनाश सडवेलकर, अविनाश गिरप, राहुल मडकईकर, मारुती दोडशानट्टी तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी.

error: Content is protected !!