जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धेत आयडियल प्रशालेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

सात विद्यार्थ्यांची इचलकरंजी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड.
कणकवली/मयुर ठाकूर.
कासार्डे येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या मुलांनी चमकदार कामगिरी करत तब्बल सात विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहॆ.ही विभागीय स्पर्धा कोल्हापूर इचलकरंजी येथे संपन्न होणार आहॆ.योग हे यशस्वी आणि निरोगी जीवनाच एक उत्तम सूत्र आहॆ तसेच योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे.योग ही एक विद्या आहॆ जी माणसाला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच योगाचे प्रशिक्षण आयडियल प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना दिले जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांची जीवनशैल्ली ही अधिकाधिक विकसित होते.दरवर्षी जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धा संपन्न होतात.गतवर्षीप्रमाणेच यावर्षी नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत आयडियल च्या मुलांनी चमकदार कामगिरी करत प्रशालेचे नाव रोशन केले आहॆ.
त्यामध्ये सतरा वर्षा खालील गटात मुलांमधून रुद्र ढगे या विद्यार्थ्यांची पाचव्या क्रमांकावर निवड झाली.चौदा वर्षाखालील गटात मुलांमधून भावेश घाडीगावकर याची पाचव्या क्रमांकावर निवड झाली आहॆ.तसेच सतरा वर्षा खालील गटात मुलींमधून हर्षिता सावंत हिची दुसऱ्या क्रमंकावर तर आर्या फाटक हिची तिसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहॆ आणि एकोणीस वर्षा खालील गटात मुलींमधून श्रावणी मराठे तिसऱ्या क्रमंकवर तर ईशा कीर्तनिया हिची चौथ्या क्रमांकावर आणि समृद्धी सावंत हिची पाचव्या क्रमांकावर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहॆ.
या यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी.तानवडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.