…नाहीतर ‘तो’ ठरेल यमाचा कॉल – श्रीनिवास नाईक

लायन्स सेवा सप्ताहानिमित्त रस्ते सुरक्षा मार्गदर्शन
निलेश जोशी । कुडाळ : वाहन चालवताना मोबाईल फोन वापरू नये नाही तर तो यमाचा कॉल होऊ शकतो. मोबाईलचा वापर गाडी थांबवूनच करावा
युवा पिढीने धूम स्टाईलने गाडी चालवणेला तात्काळ फुलस्टॉप द्यावा, नाहीतर आपल्या आयुष्याचा फुलस्टॉप लागेल, असे प्रतिपादन नाईक मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्रीनिवास नाईक यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदूर्ग या सेवाभावी संस्थेच्या सेवा सप्ताहच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियम विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ व्ही बी झोडगे लायन्स अध्यक्ष जयंती कुलकर्णी लायन्स पदाधिकारी मार्गदर्शक श्रीनिवास नाईक सीए सुनील सौदागर सचिव स्नेहा नाईक डॉ दिपाली काजरेकर अँड समीर कुळकर्णी डॉ सुशांता कुळकर्णी प्रा एस टी आवटे प्रा शरयू आसोलकर लायन्स पदाधिकारी विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री नाईक म्हणाले, भारतात दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक अपघातात मरतात तर हजारोच्या संख्येने जखमी होतात. होणारी जीवित हानी व वित्यहानी ही कुठल्याही महामारी व युध्दापेक्षा मोठी असते 80% अपघात हे माणसाच्या चुकीमुळे होतात यांत्रिक चुकांमुळे अपघात फार कमी होतात. अपघाताबाबत आपण वाहतूक नियम पाळत नाही चिन्हांची माहिती नसते. अतिउत्साह ,जबाबदारीचे भान नसणे चुकीच्या गोष्टीचा पाठपुरावा करणे या सर्व गोष्टी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. गाडी चालविणे आणि कशीही चालवणे यात खूप फरक आहे. संयम सौजन्य, सावधान सतर्कता हे महत्वाचे आहे वाहन चालविताना हेल्मेट , knee pad एल्बो पँड आदी गोष्टी सुरक्षितता दृष्टीने महत्वाच्या आहेत असे सांगत अतिशय सुंदर पद्धतीने, वेगवेगळी उदाहरणे देऊन, खिळवून ठेवणारे “रस्ता सुरक्षा” या विषयावर श्रीनिवास नाईक यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
रस्ता सुरक्षाबाबत प्रबोधन करणे काळाची गरज बनली आहे वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिस हे आपले मित्र असून काही समस्या असल्यास त्यांना सांगा. ते आपल्याला निश्चितच सहकार्य करतील. नुसती गाडी चालवता येणे महत्त्वाचे नाहीं तर त्या सोबत असणारी कागदपत्रे, इन्शुरन्स, रोड signs, helmet चा वापर , या विषयांवर मार्गदर्शन केले. लायन सचिव स्नेहा नाईक यांनी मुलांनी विज्ञान सोबत देवाचे स्मरण आणि नमस्कार व मोठ्यांना नमस्कार करूनच घरातून बाहेर पडावे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड असणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.