देवगड मधील प्रसाद लोके खून प्रकरणातील संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी
संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
देवगड तालुक्यातील मिठबाव येथील प्रसाद लोके खून प्रकरणात प्रमुख संशयित आरोपी असलेला किशोर परशुराम पवार याला आजारपणाच्या कारणामुळे न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी मंजुर केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले. दरम्यान गुन्ह्यात संशयिताने कोणते हत्यार वापरले, आरोपींनी गुन्हा कामी अन्य कुणाची मदत घेतली होती का? संशयित आरोपीकडील मोबाईल जप्त करणे अशा अन्य मुद्द्यांच्या आधारे ही पोलीस कोठडी मागण्यात आली होती. संशयित आरोपीच्या आजारपणाच्या कारणा अभावी त्याची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. 18 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडला होता. तसेच संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांकडून याप्रकरणी तपासायची चक्रे गतीने फिरवण्यात आली होती.
दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली