मालवण मधील शिवकालीन खोत वाड्यातील गणपती

मालवण मधील एक प्रसिद्ध घराणे म्हणजे खोत शिवकाळात या घराण्याला खोतकी बहाल केली गेली, खोत म्हणजे गावचा मुख्य न्याय निवाडा करणे, शेतसारा व त्याचा हिशेब ठेवणे ही, कामे महत्वाची कामे खोतांजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. महाराज ज्यावेळी सिंधुदुर्ग किल्ला बांधायच्या निमित्ताने १६६४ सालात मालवणात आले त्यावेळी त्यांनी आपल्या सरदारांसाठी ही घरे व वाडे बांधले असावेत असे वाटते. त्यापैकी एक म्हणजे हा खोत वाडा १६ खोल्यांचा हा भव्य वाडा म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. ब्रम्हस्थान मोकळे असावे, ईशान्येकडे देवघर असावं इत्यादी वास्तुशास्त्र तंतोतंत येथे दिसते.
१६ खोल्यांचा हा भव्य वाडा म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. देवघर आणि त्यात असलेली खोतांची पाटेकर भवानी, प्राचीन मूर्ती सार काही प्राचीन संस्कृतीची साक्ष आहे. शिवाजी महाराज आक्याहून पेटाऱ्यात बसून निसटले, तसाच एक पेटारा पुढील प्रवेश द्वाराच्या उजव्या बाजूस इतिहासाच्या श्रीमंतीची साक्ष देतो आहे कि,त्यावेळी एवढ्या मोठ्या पेटाऱ्यातून मिठाई, दागदागिने नजराणा म्हणून पाठवीत असत. आजही हा अजस्त्र पेटारा बघून त्यावेळची माणसं किती शक्तिशाली होती हे कळते.
खोतांचा गणेशोत्सवही मोगलकालीन आहे. आदिलशहाने ज्यावेळी हिंदूंची देवळे पाडायला व देवतांच्या मूर्तीची विटंबना करायला सुरुवात केली त्यावेळी आमचा एक पूर्वज हुशार निघाला त्याने गणपतीचे मखरच मुस्लिमांच्या ताबुतासारखे बनविले. आजही प्राचीन काळापासून जतन केलेले साचे वापरून मखर बनवितात व सजावट करतात त्यात छोटासा गणपती बसवितात. मुस्लिमांचा ताबूत जसा वाजत गाजत निघतो तसाच आपला हा गणपती मखरासह वाजत गाजत खांद्यावरून विसर्जनासाठी निघतो. हा सोहळासुद्धा पाहण्यासारखा असतो मखराच्या खालीबसून मखर आपल्या डोक्यावरून जाते त्यावेळी भक्तमंडळी आपल्या मनातील इच्छा गणपतीला सांगतात. खोतांचा हा मालवण मधील मानाचा गणपती विसर्जनासाठी निघतो त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा लोक दर्शनासाठी उभे असतात
आज इतकी वर्षे झाली तरी या परंपरा आम्ही जपल्या आहेत आणि पुढील पिढीने पण त्या जपाव्यात एवढीच इच्छा
ब्युरो न्युज, कोकण नाऊ, मालवण