शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना समन्वयक बाळा गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलें गणरायाचे दर्शन

तसेच सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत व यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत व रूपेश राऊळ यांच्या हस्ते श्री ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या श्री ठाकरे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा गणेश दर्शन दौऱ्यात त्यांनी शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या नेमळे देऊळवाडी येथील निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी नेमळे गावाच्या वतीने ठाकरे यांचे झेंडूच्या फुलांचा भलामोठा हार घालून स्वागत करण्यात आले. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आमदार ठाकरे यांचे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, रूपेश राऊळ यांचे वडील गुरूनाथ राऊळ,आर्ई वंदना राऊळ,भाऊ तूषार राऊळ, सौ.श्रेया राऊळ, सरपंच दिपाली बेहरे,उपसरपंच सखाराम राऊळ,शीतल नानोस्कर,स्नेहाली राऊळ,आरती राऊळ,संज्योता नेमळेकर, जिल्हा समन्वयक रुची राऊत गीतेश राऊत, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब,युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, विभागप्रमुख सुनील गावडे,बाळा राऊळ,शाखाप्रमुख सचिन मुळीक, रविंद्र घोगळे, रमाकांत राऊळ, शिवदत्त घोगळे, मेघश्याम काजरेकर, अशोक सावंत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी