अपघात कि घातपात ? : मुणगे मशश्वी रस्त्यावर कारची दुर्घटना

एक आढळला मृतावस्थेत

अर्जुन बापर्डेकर । आचरा ; देवगड तालुक्यात मशश्वी मुणगे रस्त्यावर सोमवारी पहाटे अपघात झाल्याअवस्थेत कार आढळून आली आहे. यातील युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत मृत अवस्थेत आढळून आला आहे.गाडीचा पुढील दरवाजा उघड्या अवस्थेत असूनकाचीवर ,बोनेटवर दरवाजावर अवजड वस्तूने आघात केल्या सारख्या खुणा दिसून येत आहेत.याबाबत खबर मिळताच देवगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रथम दर्शनी अपघात वाटत असला तरी घातपाताची शक्यता पोलीसांकडून वर्तवली जात आहे.


घटनास्थळी उपविभागीय अधिकारी किशोर सावंत, देवगड पोलीस स्टेशनचेपोनी बगळे निलकंठ,पो.उ सूधीर कदम,राजन जाधव ,प्रसाद आचरेकर,स्वप्नील भोवर,स्वप्नील ठोबरे,यांसहडाग स्कॉड, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर युवक मिठबांव येथीलप्रसाद पर्शुराम लोके असल्याचे समजते.

अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा.

error: Content is protected !!