राजधानी दिल्लीत निनादला कणकवलीतील सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज

दिल्ली मध्ये पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करण्याची संधी

कणकवली/मयूर ठाकूर.

एन. बी. एस. चॅरीटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाला दिल्लीमध्ये पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी त्यांच्या उपस्थितीत भारतीय आंतरराष्ट्रीय कन्वेंशन केंद्राचे उद्घाटन आणि विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ या निमित्ताने वादन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी २९ पेक्षा अधिक राज्यांमधून विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या कलावंत व वादकांना निमंत्रित करण्यात आले होते यामध्ये सिंधुगर्जना ढोलताशा पथकाला राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली यावेळी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री मा. नारायणराव राणे साहेब यांची कार्यक्रमस्थळी सिंधुगर्जना पथकातील वादकांना भेट झाली यावेळी त्यांनी वादकांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिनांक १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, पथकप्रमुख नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिंधुगर्जना पथक दिल्ली दौऱ्यावर होते. आज सायंकाळी गोवा विमानतळावर ठीक १.०० वाजता सिंधुगर्जना पथकाचे आगमन होणार आहे. या कामगिरीबद्दल सिंधुगर्जना पथकाचे विविध स्तरातील मान्यवरांकडून आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!