वाघेरी येथे “अभंगवाणी” गायन स्पर्धा संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर.
वाघेरी भजन प्रेमी यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये “अभंगवाणी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली.एकूण 35 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.लहान मुलांमध्ये बालभक्ती रुजावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.विठ्ठलाचे विविध अभंग या बाल विद्यार्थ्यांनी गात या स्पर्धेत सहभाग घेतला.मुलांमध्ये लहान वयापासूनच परमेश्वराच्या भक्तीची आवड निर्माण व्हावी आणि गीत गायनाची देखील आवड निर्माण व्हावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं होत.या स्पर्धेसाठी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध पखवाज विशारद मारुती मेस्त्री यांनी केले.तर या स्पर्धेसाठी चंद्रकांत गुरव बुवा यांनी मेहनत घेतली.तसेच या स्पर्धेला अनेक नामवंत भजनी बुवांनी देखील भेट दिली.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुवा श्री संतोष कानडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी गावचे सरपंच,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी गटामध्ये लोकेश सदानंद कुसवरक, शमी दत्तात्रय सावंत,वैदेही राजेश गुरव हे विजेते विद्यार्थी ठरले,तसेच तिसरी ते चौथी गटामध्ये ओम संदीप पवार,वेदिका प्रवीण राणे,पार्थ विकास गुरव हे विद्यार्थी विजेते ठरले. तर पहिली ते दुसरी गटामध्ये स्वराज प्रमोद राणे,आदित्य कृष्णा पाटील,रुद्र विशाल कदम हे विद्यार्थी विजेते झाले आहेत.सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे गावातून अभिनंदन केले जात आहे.