सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष श्री संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली मानधन समितीची पहिली बैठक संपन्न.

अनेक वंचित कलाकारांच्या कुटुंबांना लागणार हातभार.
तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीतून अनेक धोरणात्मक निर्णयांवर चर्चा.
कणकवली/मयुर ठाकूर.
सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिती नुकतीच गठीत झाली असून या समितीचे अध्यक्ष म्हणून कणकवली तालुक्याचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध बुवा संतोष कानडे यांची निवड झाली आहे.बुवा श्री संतोष कानडे यांची निवड होतात वृद्ध कलाकार मानधन समितीची तातडीची बैठक नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत अनेक धोरणात्मक विषयांवर चर्चा झाली असून काही प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वृद्ध कलाकार यांना मानधन मिळणे करता हे प्रस्ताव समितीने मंजूर केले आहेत. तातडीने घेतलेल्या या बैठकीमुळे आणि त्या बैठकीत मंजूर केलेल्या प्रलंबित प्रस्तावांमुळे अनेक गोरगरीब कलाकारांना पेन्शन लागू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कलाकारांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.या बैठकी प्रसंगी समितीचे अध्यक्ष संतोष कानडे बुवा तसेच मानधन समितीचे उपाध्यक्ष, सचिव आणि नव्याने निवड झालेले सर्व सदस्य उपस्थित होते.