सावंतवाडी तालुका भजनी बुवांच्या वतीने श्री संतोष कानडे बुवा यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न.

वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सत्काराचे आयोजन.

कणकवली/मयुर ठाकूर.

सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध भजनी बुवा आणि कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री संतोष कानडे बुवा यांची नुकतीच निवड झाली आहॆ.विविध भजनी संस्था श्री संतोष कानडे बुवा यांचे नागरि सत्कार करीत आहेत.संतोष कानडे बुवा कित्येक वर्ष संप्रदायात कार्यरत आहेत.राजकीय,सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहॆ.हाती घेतलेलं कार्य प्रामाणिक पणे करणे यात त्यांचा हातखंड आहॆ. रोखठोक भूमिका घेऊन कित्येक सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहॆ.असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले बुवा संतोष कानडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा मानधन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नुकताच सावंतवाडी तालुका भजनी बुवा यांच्या वतीने इन्सुलि गणपती मंदिर येथे भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. संतोष कानडे बुवा यांसमवेद सावंतवाडी विभागामधून निवड झालेले समितीचे सदस्य राजाराम धुरी यांचा देखील सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे अध्यक्ष बुवा श्री प्रकाश पारकर तसेच प्रसिद्ध भजनी बुवा चंद्रकांत गुरव,रवी काजरेकर बुवा,पंढरी मांजरेकर बुवा, कृष्णा राऊळ बुवा, आप्पा गावडे बुवा विजय गावडे बुवा,बाळू कांढरकर बुवा, उदय पार्सेकर बुवा,सचिन पालव बुवा,सुरेश गावडे बुवा,श्रीयुत गाढ बुवा, वैभव राणे बुवा उपस्थित होते

error: Content is protected !!