वाहन चालविताना नियमांचे काटकोर पालन करा – श्रीनिवास नाईक

लायन्स क्लब कुडाळच्या वतीने रास्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर

कुडाळ हायस्कुलचे १२० विद्यार्थी सहभागी

प्रतिनिधी । कुडाळ : रस्ता सुरक्षाबाबत प्रबोधन करणे काळाची गरज बनली आहे. वाहन चालविताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिस हे आपले मित्र असून काही समस्या असल्यास त्यांना सांगा. ते आपल्याला निश्चितच सहकार्य करतील, असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचे पदाधिकारी व नाईक मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्रीनिवास नाईक यांनी केले
लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदूर्ग या सेवाभावी संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कुडाळ हायस्कूलमध्ये 11वी च्या विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियम विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स अध्यक्ष जयंती कुळकर्णी, लायन्स पदाधिकारी मार्गदर्शक  श्रीनिवास नाईक, सीए सुनील सौदागर, स्नेहा नाईक, ऍड. समीर कुळकर्णी, डॉ प्राची तनपुरे, वाहतूक पोलीस श्री बंडगर, शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री नाईक म्हणाले, भारतात दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक अपघातात मरतात तर हजारोच्या संख्येने जखमी होतात. होणारी जीवित हानी व वित्तहानी ही कुठल्याही महामारी व युध्दापेक्षा मोठी असते. 80% अपघात हे माणसाच्या चुकीमुळे होतात यांत्रिक चुकांमुळे अपघात फार कमी होतात. अपघाताबाबत आपण वाहतूक नियम पाळत नाही. चिन्हांची माहिती नसते. अतिउत्साह ,जबाबदारीचे भान नसणे चुकीच्या गोष्टीचा पाठपुरावा करणे या सर्व गोष्टी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. गाडी चालविणे आणि कशीही चालवणे यात खूप फरक आहे. संयम, सौजन्य, सावधानता, सतर्कता हे महत्वाचे आहे. वाहन चालविताना हेल्मेट ,नी पॅड, एल्बो पँड आदी गोष्टी सुरक्षितता दृष्टीने महत्वाच्या आहेत, असे सांगत अतिशय सुंदर पद्धतीने, वेगवेगळी उदाहरणे देऊन, खिळवून ठेवणारे “रस्ता सुरक्षा” या विषयावर  श्रीनिवास नाईक यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.   वाहतूक पोलीस श्री बंडगर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कुडाळ हायस्कूलच्या 120 विद्यार्थीनी या शिबिराचा लाभ घेतला.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!