चिंदर सरपंचपदी भाजपच्या नम्रता महंकाळ बिनविरोध

विद्यमान सरपंच राजश्री कोदे यांच्या राजीनाम्यामुळे झाले होते रिक्त पद

चिंदर ग्रामपंचायतीच्या भाजप पक्षाच्या धोरणानुसार विद्यमान सरपंच राजश्री कोदे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या चिंदर
सरपंच पदाच्या निवडणूकीत भाजपच्या नम्रता शंकर महंकाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आज बुधवारी झालेल्या सरपंच निवडीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.एकूण अकरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे उमेदवारासह सात सदस्य उपस्थित होते.
यात उपसरपंच
,दिपक सुर्वे, महेंद्र मांजरेकर, , शशिकांत नाटेकर, सानिका चिंदरकर,दुर्वा पडवळ,,जान्हवी घाडी,
आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत
अशोक सावंत,बाबा परब, धोंडू चिंदरकर,महेश मांजरेकर, प्रकाश मेस्त्री,संतोष गावकर,माजी सभापती हिमाली, अमरे,मनोज हडकर,दत्ता वराडकर,अरुण घाडी,देवेंद्र हडकर,पोलीस पाटील दिनेश पाताडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सावंत यांनी नुतन पदाधिकारी यांनी ग्रामपंचायतचे काम करत असताना पक्षालाही वेळ द्या म्हणजे पार्टीही मजबूत होईल ‌.यासाठी
जो सामान्य घटक शेवटचा कार्यकर्ता त्यांचा विकास हेच उद्दिष्ट ठेवून कार्य करा असे आवाहन केले. या निवडणूकीसाठी
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गोसावी यांनी काम पाहिले यावेळी,ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

आचरा– अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!