जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल आणि टेनिक्वॉईट स्पर्धेत कणकवली कॉलेज,कणकवली चे सुयश.

कणकवली/मयुर ठाकूर

        क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा  नुकत्याच पाट हायस्कुल, कुडाळ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ विभागातील १९ वर्षाखालील मुलांच्या संघाला  द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.  तसेच क्रीडा संकुल, ओरोस येथे संपन्न झालेल्या टेनिक्वॉईट स्पर्धेत मुले आणि मुली यांच्या संघालाही द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.  या स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे-

*१९ वर्षाखालील हॉलीबॉल मुले (द्वितीय क्रमांक)
१) राज तांबे
२) पार्थ मोदी
३) दुर्गेश घाडीगांवकर
४) मंथन टक्के
५) ऋग्वेद जोशी
६) रोहित घाडीगांवकर
७) स्वयम गावडे
८) आदित्य राणे
९) आदित्य घाडीगांवकर
१०) अनिरुद्ध दळवी
११) शुभम दळवी
१२) वेदांत राणे

  • टेनिक्वॉईट स्पर्धेतील १९ वर्षाखालील मुली (द्वितीय क्रमांक)
    कु.आकांक्षा घाडीगांवकर
    कु.प्राची घाडीगांवकर.
    कु. जयश्री घाडीगावकर.
    कु.दिप्ती घाडीगांवकर
    कु. शर्वरी कदम
  • टेनिक्वॉईट स्पर्धेतील १९ वर्षाखालील मुले (द्वितीय क्रमांक)
    कु.अविकेश वाघ
    कु. विवेक डवरी
    कु. दत्तराज कामतेकर
    कु.सुजल मालवणकर
    या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका प्रा. जयश्री कसालकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रचारक मंडळ, कणकवली च्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे व सर्व संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. ए. पी. चव्हाण सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!