देशापुढील समस्यांबाबत डॉ. भालचंद्र मुणगेकर साधणार संवाद

निमित्त राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीचे

प्रतिनिधी । कुडाळ : काँग्रेसचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबर 2023 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. राहुल गांधी यांच्या या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त देशासमोर असलेल्या गंभीर समस्यांबाबत संवाद साधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि माजी खासदार डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांची पत्रकार परिषद शुक्रवार दिनांक 08 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता MIDC रेस्टहाऊस कुडाळ येथे आयोजित केली आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!