भिरवंडे रामेश्वर मंदिरात वार्षिक लघुरूद्र

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन

श्रीदेव रामेश्वर मंदिर भिरवंडे येथे उद्या सोमवारी वार्षिक लघुरूद्र कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे. तसेच श्रावण सोमवार निमित्ताने दुपारी २ वाजता महीला- फुगडी कार्यक्रम असून स्वयंभू – रवळनाथ फुगडी संघ, कणकवली बांधकरवाडी, दुपारी ४ वाजता महीला – दिंड-भजन रवळनाथ प्रासादिक महीला दिंडी भजन पडवे. ता. मालवण, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे. श्रीदेव रामेश्वर मंदिर भिरवंडे येथे विविध धार्मिक, सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन देवलये संचालक मंडळ भिरवंडे आणि ग्रामस्थांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!