गणेश भक्तांची यंदाही कोकण रेल्वेला पसंती

लाखो भक्तगण येणार कोकण रेल्वेने सिंधुदुर्ग

मुंबई वरून सुटणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या 17, 18 ,19, 20 तारीख पर्यंत कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या हाउसफुल

सावंतवाडी

कोकणातील महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सव समजला जातो. अवघ्या कोकणवासी यांचा आवडतं म्हणजे गणेशउत्सव याला मुंबईकर एक दिवसासाठी का होईना आपल्या घरी येणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी येतो. यावर्षी १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होत आहे .त्यामुळे गणेश भक्त तयारीला आतापासून निघाला आहे. त्यामुळे सप्टेंबर 17 18 19 20 पर्यंत कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या मुंबईवरून येणाऱ्या गाड्या हाऊसफुल झाल्या आहेत .गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, ते अन्य ठिकाणाहून येणाऱ्या चाकरमान्यांना येण्याचे वेद लागले आहेत. सध्या रस्ते खड्डेमुळे झाले आहेत ,त्यामुळे चाकरमान्यांची पसंती ही कोकण रेल्वेला मिळत आहे . भक्तांची पसंती कोकण रेल्वे आहे ,गणेश उत्सवासाठी जिल्ह्यात दरवर्षी एसटी, खासगी गाड्या ,आणि कोकण रेल्वे ने लाखो भक्तगण कोकणात येतात. मात्र यासाठी सर्वाधिक पसंती कोकण रेल्वेला असते. कोकण रेल्वे मार्गावरीसाठी जवळपास 312 रेल्वेच्या फेऱ्या सोडण्यात आले आहेत. या मध्य रेल्वेच्या 257, पश्चिम रेल्वेच्या 55 जागा फेरी आहे तसेच या 94 अनारक्षित फेऱ्यांचा समावेश आहे .आतापर्यंत सुमारे एक लाख दहा हजार गणेश भक्तांची तिकीट कन्फर्म झालेली आहेत. मोठया प्रमाणात कमाई कोकण रेल्वे ची झाली आहे .गणेश भक्तांची पसंती अधिक असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला कोरोडोचे उत्पन्न मिळणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने पण मुंबईकर चाकरमाने व गणेश भक्तांना चांगले सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना यासाठी आखलेली आहे .गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. याकरता ज्यादा गाड्या सोडल्या आहेत .त्या महत्त्वाच्या स्थानकाला थांबवण्यात आलेले आहेत ,त्यामुळे गणेश भक्तांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रेल्वे स्थानक ,कुडाळ रेल्वे स्थानक, कणकवली रेल्वे स्थानक, तसेच सिंधुदुर्ग स्थानक ,जी अन्य महत्त्वाची स्थानक आहेत. त्या ठिकाणी या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आले आहे.

error: Content is protected !!