भडगाव नदीवरील पुलाचे लोकार्पण

*आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट अंतर्गत २ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर
आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कुडाळ मालवण मतदार संघासाठी भरघोस निधी मंजूर करून असंख्य छोटी मोठी कामे पूर्णत्वास नेलेली आहेत. त्याचप्रमाणे भडगाव बुद्रुक येथील नदीवरील राज्य मार्ग १७९ वर येणारा हा पूल अत्यंत नादुरुस्त झालेला होता, तरी नागरिकांच्या मागणी वरून बजेट योजने अंतर्गत मठ कुडाळ पणदूर घोटगे रा मा १७९ वर भडगाव येथे उंच पातळीचा पूल बांधण्याकरिता तब्बल २ कोटी ४० लाखांचा निधी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून दिला.
येत्या गणेशोत्सवापूर्वी प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये याकरिता संबंधित यंत्रणेला सूचना देऊन पुलाच्या दोन्ही बाजूंचे राहिलेले काम आमदार महोदयांनी पूर्ण करून घेतले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भडगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व भडगाव येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज या पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
याप्रसंगी शाखाप्रमुख राजेंद्र लोट, शाखा संघटक सुहास गुरव, उपशाखा प्रमुख राजाराम गुरव, युवासेनेचे गौरव लोट, मा उपसरपंच बाबी गुरव, श्रीनिवास नाईक, कृष्णा घाडी, समीर लोट, जगन्नाथ सावंत, प्रथमेश सावंत, महेश लोट, श्रीकांत साळवी, विलास लोट, संतोष सावंत, किरण गुरव, सागर गुरव आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
कुडाळ प्रतिनिधी





