साळगाव जांभरमळा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन
आ. वैभव नाईक, संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ; शिवसेनेचा पाठपुरावा
कुडाळ : साळगाव गावातील महसुली गाव जांभरमळा मध्ये शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे. त्यामध्ये बोरवेल खोदणे, पाईपलाईन करणे, टाकी बांधणे या कामासाठी ८६ लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या कामाचे भूमिपूजन कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्या तृप्ती सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. शिवसेनेने ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला असून लवकरच हे काम पूर्ण करून जांभरमळा येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणारा आहे. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने आ. वैभव नाईक,संजय पडते यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, शाखाप्रमुख हेमंत सावंत, उपशाखाप्रमुख नामदेव तावडे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी सावंत, सदस्या तेजस्विनी सावंत, सदस्या मानसी धुरी, सदस्या सिद्धी मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम धुरी, उपाध्यक्ष अविनाश धुरी, युवासेना उपविभागप्रमुख रोहित सावंत, बंड्या कोरगावकर, चेतन सावंत, राकेश धुरी, माजी ग्रा. प. सदस्य दत्ताराम लाड, जेष्ठ शिवसैनिक सावंत, माजी शाखा प्रमुख गणेश धुरी, बाबा धुरी, शिवाजी टिळवे, संदीप सावंत, रुपाली सावंत, चंद्रावती सावंत, समीक्षा सावंत, नमिता घाग, दीपाली धुरी, रसिका धुरी, जमीनमालक शुभांगी खेमासावंत, सत्यभामा धुरी, दिगंबर सावंत, पूर्वा धुरी, माधवी धुरी आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ