पळसंब येथे वृक्ष रक्षाबंधन आणि पर्यावरण पुरक राखी स्पर्धा

मुलांना लहान वयातच वृक्षसंवर्धनाचे महत्व समजावे यादृष्टीने पळसंब प्राथमिक शाळेत वृक्ष रक्षाबंधन करण्यात आले.यावेळी आयोजित पर्यावरण पुरक राखी स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिल्या पहिली ते दुसरी गटात यशवंत परब दिव्या परब यांनी प्रथम द्वितीय तर तृतीय तन्मय चव्हाण यानी क्रमांक पटकावले. दुसरया गटात प्रथम मृन्मयी बने,द्वितीय स्पृहा पवार, तर तृतीय स्वरा सावंत यांना गौरविण्यात आले. तिसऱ्या गटात चंदा पळसंबकर प्रथम ,साक्षी जंगले द्वितीय ,तरआर्या सावंत तृतीया नंबर मिळविले. या कार्यक्रमास पळसंब सरपंच महेश वरक उपसरपंच अविराज परब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवी सावंत उपाध्यक्ष रमेश मुणगेकर अमरेश पुजारे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, सुहास सावंत, सुभाष पळसंबकर शितल बागवे योगिता कदम या सह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कदम यांनी केले ,निवेदन श्रीमती कदम मॅडम तर आभार शितल बागवे यांनी मानले.
आचरा / अर्जुन बापर्डेकर