ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी तर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त स्री पुरुषांसाठी नारळ लढविणे स्पर्धा आणि शोभायात्रेचे आयोजन
नारळी पौर्णिमे निमित्त बुधवार ३० ऑगस्ट रोजी सायं.४ वा आचरा पिरावाडी येथे संपूर्ण पिरावाडी गावातील महिलांची भव्य कलश मिरवणूक ढोल ताशांच्या गजरातसमुद्रकिनारी काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंडळातर्फे पुरुष आणि महिलांसाठी नारळ लढवायची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिलांसाठी होणारी नारळ लढवण्याच्या स्पर्धे करता सहभागी महिलांना ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी कडून नारळ पुरविण्यात येतील स्पर्धेतून विजेत्या स्पर्धकास रोख रुपये १०००/- आणि चषक तर उपविजेत्या स्पर्धकास रोख रुपये ५००/- मंडळाकडून देण्यात येतील… तर पुरुषांसाठी होणारी नारळ लढवण्याची स्पर्धा दोन गटांमध्ये होईल गट पहिला – पहिली ते दहावी आणि दुसरा गट – खुला गट …यामध्ये स्पर्धकांनी नारळ आपापले वापरायचे आहेत दोन्ही गटांमध्ये विजेत्या स्पर्धकास रुपये १०००/- आणि चषक आणि उपविजेत्या स्पर्धकासाठी रुपये ५००/- असं पारितोषिक मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. (दोन्ही स्पर्धा ह्या पिराववाडी मर्यादित असतील) ही स्पर्धा संपल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी मिळून आपण आणलेला नारळ समुद्राच्या ठिकाणी विसर्जन करायचा आहे. या गाबित बांधवांच्या नारळी पौर्णिमेच्या खास कलश मिरवणूक आणि नारळ लडवणे स्पर्धेमध्ये पिरावाडीतील सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामोन्नती मंडळ आचरा पिरावाडी तर्फे करण्यात आले आहे .
आचरा / अर्जुन बापर्डेकर