आचरा पोलीसांतर्फे समुद्र किनारी सायकल पेट्रोलिंग

आगामी सण आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी आचरा पोलीस आणि स्थानिक मच्छिमारांच्या सोबतीने सायकल पेट्रोलिंग करत किनारपट्टी तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत किनारपट्टीवर कोणतीही संशयास्पद वस्तू मिळून आली नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर यांनी सांगितले.
या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या सोबत आचरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली पाटील, महेश देसाई,सौ मिनाक्षी देसाई, ज्योती परब,स्वाती आचरेकर,सौ तांबे,अक्षय धेंडे, महेश जगताप,मिलिंद परब, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांच्या सह स्थानिक मच्छीमार आदी सहभागी झाले होते.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी
उपस्थित स्थानिक नागरिक व स्थानिक मच्छिमार यांना काही संशयास्पद वस्तू मिळून आल्यास तात्काळ पोलीस ठाणेस माहिती देण्याबाबत आवाहन करण्यात आले.
आचरा / अर्जुन बापर्डेकर