लोरे ग्रामपंचायत मध्ये शासकीय कामात अडथळा झालाच नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर रावराणे यांची प्रसिद्धी पत्रका द्वारे माहिती
गेल्याच आठवड्यात लोरे नंबर एक चे सरपंच अजय तुळशीदास रावराणे. यांच्या घराच्या अतिक्रमणासंदर्भात आवाज उठवल्यामुळे, तो राग मनात ठेवून, कालच्या बोलावलेल्या ग्रामसभेमध्ये अनेक प्रश्नांचा भडीमार करत, असता सरपंच व त्याचे वडील त्यांचे बंधू अशा तिघांनाही ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रश्नांचा भडीमार करून गावातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या कामासंदर्भात विचारणा केली असता, अनेक मुद्दे बाजूला ठेवून ग्रामसभेमध्ये बंद असलेली मायनिंग चालू करण्यासंदर्भात ठराव पास करून घेण्याकरिता, बाजूच्या नवीन कुर्ली पुनर्वसन गावातील काही गावातील लोक जमवून, ग्रामसभेत हेतू पुरस्कार गोंधळ घालण्याचा प्रयत्न सरपंच यांच्या गटाकडूनच झाला. व विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे न देता गोंधळून गेलेले सरपंच व त्यांचे बंधू व वडील तुळशीदास रावराणे यांनी प्रश्नांची उलट सुलट उत्तर देत ग्रामस्थांना 1958 च्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करू अशी थेट धमकीच दिली. व ग्रामसभेत गोंधळ घालण्याचा त्यांनीच प्रयत्न केला. असे असूनही ठरवून सरपंच यांच्या घराची तक्रार केली म्हणूनच मनात राग ठेवून भ्रष्टाचारी ऋतुराज महादेव कदम वय वर्ष 42 या ग्रामसेवकला हाताशी धरून. जबरदस्ती पोलीस स्टेशनला नेऊन, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा केविलवाणा प्रयत्न या सरपंच बाप लेकाने केलेला आहे. आम्ही गावाच्या हितासाठी कायमच काम करत असून, सत्ताधारी बाप लेकांना अशी तालुक्यामध्ये बोंब केली की आम्हाला आमच्या गावात विरोधक शिल्लक नाही. परंतु गावातील परिस्थिती फारच वेगळी आहे या बाप, लेख यांच्या कारभाराला लोरे नंबर एकचे ग्रामस्थ कंटाळलेले आहे.आम्ही विरोध केला म्हणून त्यांनी आपल्या नेत्यांच्या मार्फत जबरदस्ती आमच्यावर गुन्हे दाखल करायला लावले. त्या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाई लढूच, पण लोरे गावातील ग्रामपंचायती मधला भ्रष्टाचार व लोरे गावातील सरपंचांनी केलेले स्वतःच्या घराचे अतिक्रमण यांच्या संदर्भात आम्ही वरिष्ठ पातळीवर आवाज उठवणार. आहोत लोरे गाव सरपंचावर कारवाई होणे गरजेचे आहे आणि ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही तसा निर्धार केलेला आहे जे गुन्हे दाखल केले त्याचे आम्ही कायद्यानेच उत्तर देऊ ग्रामसेवक हे कोणा एका व्यक्तीचे नसून ते संपूर्ण गावाचे असतात, आम्ही सरकार दरबारी गावातून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहोत. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसून, सत्ताधाऱ्याने सत्तेचा माज दाखवत आमच्यावर ग्रामसेवकाला हाताशी धरून कारवाई करण्याचा खोटारडा आणि केविलवाना प्रयत्न केलेला आहे.
कणकवली प्रतिनिधी