देवगड तालुक्यात तलाठ्यांची कार्यालयात उपस्थिती बाबत वेळापत्रक जाहीर करा
अन्यथा आंदोलन छेडणार
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शिष्टमंडळाचा तहसीलदारांना इशारा
देवगड तालुक्यातील तलाठी यांच्याकडे एकापेक्षा जास्त सजेचा कारभार दिला आहे. शासन निर्णय असताना देखील ग्रामपंचायती व तलाठी कार्यालयात येथे दर्शनी भागावर उपस्थित बाबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापही देवगड तालुक्यातील तलाठ्यांनी सदर शासन आदेशाची अंमलबजावणी केली दिसून येत नसल्यामुळे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार रमेश पवार यांची भेट घेऊन तलाठ्यांना प्रत्येक सजेवर वेळापत्रक प्रसिद्ध करण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी तहसीलदार यांना दिला.
निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य जनतेला तलाठी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने तलाठ्यांना सजांमध्ये उपस्थित राहण्याचे शासकीय परिपत्रक संकीर्ण 2023 / प्र. क्र. ९१/ई-१० दि 18.08.2023 आदेश दिले आहेत ज्या तलाठ्यांकडे एकापेक्षा जास्त सजेचा कार्यभार दिलेला आहे त्यावर सर्व तलाठ्यांनी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय येथे दर्शनी भागावर उपस्थितीत बाबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत मात्र अद्यापही तालुक्यातील तलाठ्यांनी सदर शासन आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही व आपला याकडे दुर्लक्ष होत आहे तरी याबाबत त्वरित कारवाई करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात युवा सेनेमार्फत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी तहसीलदार रमेश पवार यांना दिला आहे.
यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे तालुकाप्रमुख गणेश गावकर काझी उपतालुकाप्रमुख तुषार धुरी, गुरु वाळी, बाळू कावले प्रफुल्ल कनेरकर, महेंद्र भुजबळ वैभ आदि पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी