सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधत आयडियल च्या मुलांनी केल अनोख रक्षाबंधन.

परिसरातील झाडांना देखील राखी बांधत केलं वृक्षाबंधन.

ज्ञानदा शिक्षण संस्थेचे,आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे प्रशालेचा अभिनव उपक्रम.

कणकवली/मयुर ठाकूर.

भावा बहिणीचं अतूट नातं व्यक्त करण्याचा दिवस अर्थातच रक्षाबंधन. आजच्या या पवित्र दिनी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे,आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स,वरवडे. या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी विविध उपक्रम राबवत रक्षाबंधन साजरे केले. प्रशालेमध्ये स्वतः बनविलेल्या राख्यांच प्रदर्शन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केले. तसेच रक्षाबंधनाचे औचित्य साधत पॉट वर्कशॉप देखील राबविण्यात आल.आवारातील झाडांना राखी बांधून हा सण प्रशालेत उत्साहात साजरा केला गेला.तसेच कणकवली नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना नगरपालिकेत जाऊन आयडियल च्या विद्यार्थिनींनी राखी बांधली आणि अनोख्या पद्धतीत रक्षाबंधन साजर केल. या सफाई कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांचे स्वागत केले अत्यंत आदरयुक्त भावना मनामध्ये ठेवत प्रत्येक विद्यार्थ्यास खाऊ वितरित केले.अश्याप्रकारे हा सण अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!