कळसुली ग्रामपंचायत मार्फत क्युआर कोड द्वारे कर वसुली

ग्रामपंचायत कडून स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ
कळसुली ग्रामपंचायत च्या वतीने डिजिटल पद्धतीचा अवलंब करत क्युआर कोड पद्धतीने कर वसुली करण्याचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत कडून केली जाणारी कर वसुली ही यापूर्वी रोख स्वरूपात करून ती ग्रामपंचायत द्वारे बँकेमध्ये जमा केली जात होती. मात्र या आता नव्या पद्धतीद्वारे क्युआर कोड स्कॅन करून थेट ग्रामपंचायतच्या अकाउंटला पैसे जमा करता येणार आहेत. गावातून सर्वप्रथम तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत यांनी ही रक्कम जमा केली. ग्रामस्थांनी या नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा व कर जमा करावा असे आवाहन सरपंच सचिन पारधीये, उपसरपंच गणेश मठकर यांनी केले आहे. यावेळी जयवंत घाडगावकर, भिकाजी मठकर, साईराज परब, रणजीत परब, अमृता पडावे आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





