तळवडे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत तांबोळीचे स्वरधारा भजन मंडळ प्रथम

सावंतवाडी
स्व. प्रकाश परब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व मा. दिपक केसरकर पुरस्कृत तळवडे ग्रामस्थ आयोजित निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा भजन मंडळ ( तांबोळी ) याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय दत्तगुरु भजन मंडळ ( वैभववाडी ) तृतीय रवळनाथ भजन मंडळ ( पिंगुळी ) तर उत्तेजनार्थ क्रमांक सनामदेव भजन मंडळ ( सांगेली ) यांनी मिळविला.
उकृष्ट गायक - ( अमित तांबोळकर ) स्वरधारा भजन मंडळ तांबोळी , उकृष्ट - हार्मोनियम ( खेमराज सनाम ) सनामदेव भजन मंडळ, सांगेली , उकृष्ट पखवाजवादक - ( मेहल कांडरकर ) स्वरधारा भजन मंडळ, तांबोळी, उकृष्ट तबलावादक -(अमन सातार्डेकर ) रवळनाथ भजन मंडळ,पिंगुळी उकृष्ट झांजवादक - ( कृणाल परब ) दत्तप्रसाद भजन मंडळ,वर्दे यांनी मिळविला.या स्पर्धेला एकूण सात भजन संघानी सहभाग घेतला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून अजित गोसावी ( कणकवली ) यांनी केले.





