धमाकेदार ऑफर सह,”अरविंद साडी महासेल” पुन्हा उद्यापासून कणकवलीत सुरू!

सेलच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी चहा नाष्टा मोफत

अनेक ब्रँडेड साड्या, हँडलूमसह बरेच काही सेलमध्ये उपलब्ध

सेल सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच आज लक्ष्मी- विष्णु हॉल मध्ये गर्दी

कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित राहिलेला “अरविंद साडी” व हँडलूम सेल पुन्हा उद्या 29 ऑगस्ट पासुन कणकवली कॉलेज रोड लगतच्या लक्ष्मी – विष्णू मंगल कार्यालयात सुरू होत आहे. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत हा सेल सुरू राहणार असून कणकवलीकरांना पुन्हा एकदा या सेलद्वारे धमाकेदार ऑफर मिळणार आहेत. या सेलच्या शुभारंभ दिवशीच सकाळी खरेदी करिता येणाऱ्या सर्व ग्राहकांना चहा व नाष्टा पूर्णपणे मोफत देण्याची ऑफर देखील सेल चे मालक शाम आहुजा यांनी जाहीर केली आहे. कणकवलीत हा सेल काही दिवस चालल्यानंतर काही कारणाने बंद करण्यात आला होता. त्यानंतर सावंतवाडी मध्ये देखील या सेलला तुफान प्रतिसाद मिळाला. त्या पाठोपाठ आता पुन्हा कणकवलीत त्याच ठिकाणी हा सेल सुरू होत असल्याने कणकवलीकरांना ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर हा सेल म्हणजे खरेदी साठी पर्वणी ठरणार आहे. विविध प्रकारच्या साड्या, यासह अन्य हँडलूम वस्तू या सेलमध्ये अत्यंत माफक दरात उपलब्ध होत असल्याने या सेलमध्ये आज सोमवारी सायंकाळ पासूनच खरेदी करता ग्राहकांची झुंबड उडाली आहे. “लग्नाचा मुहूर्त आमच्या इथूनच सुरू होतो” या टॅगलाईन खाली या सेलने धमाकेदार ऑफर ग्राहकांसाठी खुल्या केल्या आहेत. यामध्ये “बाई पण भारी देवा” फेम साडी अवघ्या 400 रुपयांमध्ये तर बनारसी शालू 3 हजार रुपये किमतीचा अवघ्या 1 हजार रुपयात, सिंधू साडी 600 रुपयांमध्ये दोन नग, विमल परकर 100 रुपयांमध्ये 1 नग, साउथ इंडियन साडी 3 हजार रुपयांची अवघ्या 1 हजार रुपयात, तर पेशवाई सिल्क साडी अवघ्या 999 रुपयात, कॉटन गाऊन 500 रुपयांमध्ये 3 नग, कॉटन वायल मंगळसूत्र साडी 500 रुपयांमध्ये 2 नग, सियाराम पॅन्ट शर्ट कापड 700 रुपयाला 2 नग, तसेच हॅन्डलूम ॲटम मध्ये चटई 300 रुपयाला 2 नग, पायपुसणी 100 रुपयाला 3 नग, सिंगल ब्लॅंकेट 1 हजार रुपयाला 4 नग, डबल ब्लॅंकेट 1 हजार रुपयाला 3 नग, सिंगल बेडशीट 300 रुपयाला 2 नग, डबल बेडशीट उशी कव्हर सहित 600 रुपयाला 2 नग, टॉवेल 100 रुपयाला 3 अशा मोठ्या धमाकेदार ऑफर्स सहीत हा सेल उद्या जनतेसाठी सुरू होत आहे. या सेल मध्ये या वस्तू अनुभवा व खरेदी करा असे आवाहन सेल्स चे संचालक व मालक शाम आहुजा यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9922338500, व 9284746447 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!