भिरवंडे रामेश्वराच्या चरणी चांदीचा कलश अर्पण

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत यांचे सौजन्य
भिरवंडे गावचे सुपुत्र संदेश उर्फ गोट्या सावंत व सौ संजना सावंत यांनी दुसऱ्या श्रावणी सोमवाऱी आपल्या गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर चरणी चांदीचा ” कलश ” अर्पण केला. यावेळी उदय सावंत, महेंद्र सावंत, राजेंद्र उर्फ बाळा सावंत, सुनील सावंत, आबा सावंत, संतोष सावंत, श्रीकांत सावंत, मिलिंद बोभाटे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कलश अर्पण केल्या बद्धल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
कणकवली प्रतिनिधी





