चंद्रयान 3 च्या लँडिंग नंतर कणकवलीत जंगी जल्लोष

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव साजरा

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण

चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग नंतर कणकवली पटवर्धन चौकात भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पटवर्धन चौकात चंद्रयान 3 चे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष आण्णा कोदे, डॉ. सुहास पावसकर, दादा कुडतरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व अनेक नागरिक शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते. चंद्रयानाचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर कणकवली पटवर्धन चौकात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. याप्रसंगी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आला.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!