चंद्रयान तीन मिशन सक्सेस

भारत ठरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा जगातील पहिला देश.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा फडकावत केला आनंद व्यक्त.
कणकवली/मयुर ठाकूर
इस्रोच्या माहितीनुसार चंद्रयान तीन हे ठीक सहा वाजून तीन मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार होतं आणि इस्रोची ही मोहीम यशस्वी झाली असून चंद्रयान तीन यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँड झालं आहे. संपूर्ण भारतभरात अत्यंत आनंदी वातावरण असून भारत देश हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा जगातील पहिला देश बनला आहे. संपूर्ण जगभरातून समाधान व्यक्त होत असून भारतीय इस्रोचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.





