कणकवली लगतच्या गावातील एका व्यवसायिकाला मारहाण
“त्या” व्यावसायीका सह मुलाने गावातील युवकाला मारहाण केल्याच्या घटनेचा घेतला बदला
कणकवली पोलिसांची घटनास्थळी धाव, विषयावर पडदा
कणकवली शहरालगत असलेल्या एका गावात महामार्ग लगत असलेल्या एका व्यवसायिक पिता पुत्राने त्या गावातील स्थानिकाला आज बुधवारी सकाळच्या सुमारास मारहाण केल्याने याचा बदला त्याच स्टाईल ने त्या गावातील लोकांनी एकत्र येत घेतला. यात गेली अनेक वर्षे आपल्या “लीला” नी चर्चेत असलेल्या त्या व्यावसायिका सह मुलग्याला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा आरोप त्या व्यवसायिकाने केला. बुधवारी सकाळी त्या व्यावसायिकाच्या घरासमोरील भागात महामार्गावर दुचाकी लावल्यावर त्या व्यावसायिकाने उद्धट वर्तन करत बाचाबाची करून आपल्याला मारहाण केली असा आरोप त्या स्थानिक तरुणाने केला. यातून जोरदार बाचाबाची होत सायंकाळी सकाळच्या त्या घटनेचा वचपा काढून अखेर त्या व्यावसायिकाला सव्याज परतफेड करत बदला घेण्यात आला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व नंतर या विषयावर पडदा पडला. याबाबत उपलब्ध माहितीनुसार बुधवारी सकाळी महामार्ग लगतच्या गावातील तरुण आपली दुचाकी घेऊन दुपारी घराच्या दिशेने जात असताना पाऊस आल्याने त्या व्यवसायिकाच्या घरासमोरील महामार्गावरच आपली दुचाकी लावून आडोशाला थांबला. याच दरम्यान त्या व्यवसायिकाचा मुलगा व व्यावसायिकाने त्या तरुणाला माझ्या घरासमोरील दुचाकी काढ असे सांगितल्यावर तेथे त्या तिघांची बाचाबाची झाली. व शब्दाला शब्द वाढत जात त्या तरुणाला त्या व्यवसायिकाने व त्याच्या मुलाने पोटावर बसून मारहाण केली असा आरोप त्या तरुणाने केला. ही घटना बुधवारी दिवसभर त्या गावामध्ये चर्चेत असताना सायंकाळी गावातील अनेकांनी एकत्र येत त्या तरुणाला केलेल्या सकाळच्या मारहाणीच्या घटनेचा बदला घेतला व जशास तसे उत्तर देत परतफेड केली. आज रात्री त्या व्यवसायिकाच्या घराजवळ गावातील अनेकांनी जमून व्यावसायिकासह त्याच्या मुलाला मारहाण केल्यानंतर त्या व्यावसायिकाने तात्काळ कणकवली पोलिसात फोन केला. कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मनोज गुरव व भूषण सुतार यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही तक्रार असल्यास पोलिसात तक्रार देण्याची सूचना केल. व अखेर त्या गावातील ग्रामस्थांनी देखील जर या व्यावसायिकांनी तक्रार केली तर आमची देखील तक्रार घ्या असे सांगितले. अखेर या विषयावर तूर्तास पडदा टाकण्यात आला. मात्र कणकवली सह आसपास या घटनेची चर्चा सुरू होती.
दिगंबर वालावलकर /कणकवली