शिडवणे ग्रामपंचायत कडून शिडवणे नं. १ शाळेला दोन दूरदर्शन संच प्रदान

जिल्हा परिषद शाळांना सध्या डिजिटल स्वरुप प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत. शाळांमध्ये कोरोना काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिकविताना शिक्षकांनी केलेले प्रयत्न मोलाचे असेच होते. त्या काळात आपल्या शाळेत शिकलेली सर्व मुले दहावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत. शिक्षणाचा पाया मजबूत असल्याशिवाय असे घडू शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत शिडवणे यांनी दिलेली दोन स्मार्ट टीव्हींची भेट ही मुलांच्या स्मार्ट शिक्षणासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे , असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी शिडवणे नं. १ शाळेत आयोजित समारंभपूर्वक कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केले.
त्यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचे समारंभपूर्वक प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत केले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दोन्ही स्मार्ट टीव्हींचे अनावरण करण्यात आले.
त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के , निवृत्त कृषी अधिकारी बंडू कोकाटे , तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र टक्के , दयानंद कुडतरकर , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे , माजी उपसरपंच अनिल पांचाळ , शांताराम धुमाळ , सुप्रिया पाष्टे , सुप्रिया पांचाळ . स्मिता टक्के , कोमल शेट्ये , दिपीका शेट्ये , पोलीस पाटील समीर कुडतरकर , रामचंद्र पाटणकर , श्रीराम पाष्टे , योगेश सुतार , प्रेरणा कासार्डेकर , मंजुळा गुंडये , माजी मुख्याध्यापक सुनिल तांबे , उपाध्यक्षा समिता सुतार , अंगणवाडीच्या पाटणकरबाई , प्रवीण पाटणकर , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. ग्रामपंचायत शिडवणे यांनी शाळेला दोन दूरदर्शन संच दिल्याबद्दल शाळेने त्यांना आभार पत्र दिले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





