समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करा !

तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज !
झाडे हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात !
माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत
सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील शासकीय, अशासकीय व खाजगी संस्थांच्या सहकार्यातून या वर्षी वृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आले आहे. विविध खात्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा प्राधिकरण गरुड सर्कल क्षेत्रात सामुहिक पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आली. माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांचे शुभहस्ते वृक्ष लागवड कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे. वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. झाडे हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात. या वर्षी कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस आणि छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय किर्लोस ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वनखाते व अन्य खात्यांच्या सहकार्याने २५ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. लागवड करून झाडांचे संगोपन करणे तितकेच महत्वाचे आहे असे ते म्हणाले. आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त झाडांची लागवड झाली असून सप्टेंबर अखेर पर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे. वन खात्याने मोठ्या प्रमाणात ह्या मोहिमेसाठी झाडे पुरवठा केली त्याबद्दल वनखात्याचे धन्यवाद व्यक्त केले. पर्यावरण रक्षणासाठी इकॉलॉजीकल टास्क फोर्सची स्थापना करणार असल्याचे ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले. लागवडीच्या सुरुवातीला पर्यावरण रक्षणाची शपथ सर्वांच्या उपस्थित घेण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, उपसंचालक कृषि विभाग श्रीम.अरुणा लांडे, कृषि विकास अधिकारी जे. बी. झगडे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, श्री. प्रदिप सावंत, सचिव श्री. शांताराम रावराणे, संस्था सल्लागार सुरेश किसीन्नि, सत्या, सुनील रावूळ, महिंद्र सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण सी. एच जगदाळे, वनरक्षक उत्तम कांबळे, प्रियांका पाटील, कृषि पर्यवेक्षक पांडुरंग हडकर, योगेश वालावलकर, प्रताप चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालाय मुळदेचे प्राध्यापक जी. आर. उइके, डॉन बॉस्को स्कूल प्राध्यापक रोहिदास राणे, काजू प्रक्रियादार सुरेश नेरूरकर, वैभव होडवडेकर, एस. के. सावंत, रामकृष्ण सावंत, ओरोस बुद्रुक सरपंच श्रीम. आशा मुरमुरे, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर, छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शेतकरी, कृषि पदवीचे विद्यार्थी, NCC व NSS चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राधिकरण क्षेत्रातील गरुड सर्कल ते ओरोस बस स्थानक च्या दूतर्फाला विविध प्रकारची १०० झाडे लावण्यात आली.
भास्कर काजरेकर
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस





