कुडाळ येथे ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेका’चे आयोजन

कीर्तन, प्रवचन, गायन आणि मंत्रजागर होणार

प्रतिनिधी । कुडाळ : भगवान श्री पुरुषोत्तम महाविष्णू यांच्या कृपेने सर्वांचा सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कर्ष व्हावा, यासाठी अधिक श्रावण मासात ४ ते ८ ऑगस्ट (अधिक श्रावण कृष्ण चतुर्थी ते अष्टमी) या कालावधीत विद्वान घनपाठी वैदिकांच्या उपस्थितीत ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेक’ कार्यक्रम आयोजित केला आहे.
शहरातील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये (पंचायत समिती कार्यालयाजवळ) ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेक’, होणार आहेत. ४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘मंत्रजागर’, ५ ऑगस्ट या दिवशी रात्री ९ वाजता ह.भ.प. (सौ.) अवंतिका टोळे (पुणे) यांचे कीर्तन, ६ ऑगस्ट या दिवशी रात्री ९ वाजता श्री. राजाभाऊ शेंबेकर (चिपळूण) आणि सौ. राधा जोशी- आठल्ये (देवगड) यांचे अभंग आणि नाट्यगीत गायन, ७ ऑगस्ट या दिवशी रात्री ९ वाजता वेदमूर्ती श्री विवेकशास्त्री गोडबोले (सातारा) यांचे प्रवचन आणि ८ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजता पारायण समाप्ती, असे कार्यक्रम होणार आहेत.
अधिक मासाच्या पर्वकाळात या पारायणानिमित्त होणार्‍या कीर्तन, प्रवचन, गायन आणि मंत्रजागर या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वेदप्रेमी ब्रह्मवृंद यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!