अतिवृष्टीमुळे झाड पडून नुकसान झालेल्या कुटुंबाला माजी आमदार राजन तेली यांच्याकडून मदत
सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यांतील परबवाडा गावातील मासुरा वाडीतील विजय पारकर यांच्या घरावर माड पडून नुकसान झाले होते याची माहिती स्थानिकांनी माजी आमदार राजन तेली यांना सांगितले. त्यांनी याची दखल घेत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना रोख रुपये स्वरूपात मदत केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, सरपंच सौ. शमिका बांदेकर उपसरपंच पपू परब, ग्राम सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, सूहिता हळदणकर, स्वरा देसाई, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, सायमन आल्मेडा, शैलेश बांदेकर, जीजी साटेलकर, हरी साटेलकर, बाळा साटेलकर, विजय मूनणकर, महेश राऊल, निनाद मलबारी, भूषण साटेलकर, संजना साटेलकर, बाळा कपडोस्कर, हर्षदा साटेलकर, गौरेष कापडोस्कर आदी उपस्थित होते..