लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था कणकवली तर्फे वृक्ष लागवड

आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे येथे करण्यात आली वृक्षांची लागवड.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल यांनी केले संस्थेच्या कार्याचे कौतुक.
जिल्हा संघटक पंढरी जाधव आणि कणकवली युवा तालुकाध्यक्ष मयुर ठाकूर यांचा अभिनव उपक्रम
कणकवली/प्रतिनिधी.
लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. त्यांना “लोकमान्य” ही पदवी देखील बहाल करण्यात आली,लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते.तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते.”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. आज त्यांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी केली जात आहॆ. नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या कडून वृक्षलागवड करून अनोख्या पद्धतीत लोकमान्य टिळक यांना मानवंदना देण्यात आली. आयडियल इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे येथे वृक्षलागवड करून चिमुकल्या मुलांना पर्यावरणाच महत्व पटवून देण्यात आल. लहानपणापासून मुलांमध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण व्हावी म्हणून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थेचे जिल्हा संघटक पंढरी जाधव आणि कणकवली तालुका युवाध्यक्ष मयूर ठाकूर यांच्या संकल्पनेतून राबविला गेला. प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल आणि आयडियल कॉलेज चे प्रिंसिपल सौ देसाई मॅडम आणि सहकारी शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
संस्था अत्यंत चांगले उपक्रम राबवित असून संस्थेच्या माध्यमातून रबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे यावेळी श्री बुलंद पटेल यांनी कौतुक केले तसेच वरवडे गावातील ग्रामस्थान्नी देखील संस्थेसाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.