नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविधमागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भव्य राजव्यापी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र विधानसभेचे कामकाज बंद असल्यामुळे हा मोर्चा तूर्तास स्थगित

सावंतवाडी
नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भव्य राजव्यापी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र विधानसभेचे कामकाज बंद असल्यामुळे हा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देविदास आडारकर यांनी दिली. याबाबत त्यांनी निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३१जुलैला भव्य राजव्यापी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र ३१ जुलैला विधानसभेचे कामकाज बंद असल्याकारणाने महामोर्चा तुर्तास स्थगित गीत करण्यात आला आहे. व राज्य पातळीवर संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नगर परिषदेसमोर निदर्शने करण्यात येत आहेत
शासनाने संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या मागणीचे निवेदन यासोबत जोडले आहे. तरी कर्मचाऱ्यांची मागणी आपण शासनाकडे पोहोचविण्यात, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.





