क्रिकेट ग्रुप वतीने बाबू ढोले यास २१००० हजाराची आर्थिक मदत

मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने बाबू ढोले या मालवण मधील सामाजिक सेवा करणाऱ्या समाजसेवकासाठी प्रत्येकाने रू१०० किव्हा रू ५० मदतीचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला बऱ्याच दानशूर व्यक्तींनी फुल ना फुलाची पाकळी देत आहेत त्यात ही मदत त्याच्या वैद्यकीय आणि त्याच्या डोळ्याच्या आजाराने त्रस्त असल्यानी त्याउपचारासाठी वापरण्यात येण्यासाठी मालवण तालुक्यातील नागरिक ,संस्था आणि होतकरू यांना आवाहन केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज ३१/७/२०२३ सकाळी ११.३० वाजता मालवण तालुक्यातील पंचक्रोशी क्रिकेट क्लब, ग्रुप तर्फे बाबू ढोले यांना आर्थिक मदत रोख रूपये २१००० मातृत्व आधार फाउंडेशनच्या संस्थापक संतोष लुडबे यांच्या उपस्थितीत देण्यात आली. या ग्रूप मध्ये, कुंभारमाठ, देवली, घुमडे, आंबेरी, चौके, साळेल, आनंदव्हाळ, धामापूर, आमडोस, घाडीवाडी, नांगरभाट या ठिकाणचे मदत देणारे क्रिकेट प्रेमी आहेत. ही मदत देताना प्रसिद्ध क्रिकेट समालोचक शामा वाक्कर, डॉ. धनंजय सावंत किशोर पवार यांच्या वतीने देण्यात आली. यावेळी बहुसंख्य संस्था देणगीदार उपस्थित होते .या बद्दल बाबू ढोले यांच्या वतीने फाउंडेशनचे संतोष लूडबे यांनी पंचक्रोशी क्रिकेट क्लबचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
मालवण प्रतिनिधी





