दरडीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील धनगर वस्तीचा सर्वे व्हावा

धनगर नेते लक्ष्मण शेळके यांची मागणी

सिंधुदुर्ग सह कोकणात सह्याद्री भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्य करणारी धनगर वस्ती आहे राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या दरडीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ची धनगर वस्ती ही दर्डीच्या धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर सह्याद्री पट्ट्यातील धनगर वस्तीची पाहणी करून आवश्यकता पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी धनगर नेते लक्ष्मण शेळके यांनी आमदार नितेश राणे. यांच्या. माध्यमातून शासणा कडे. केली आहे.

सह्याद्री भागात वास्तव्य करणारी मोठ्या प्रमाणात धनगर वस्ती असून पावसा अभावी त्यांना दरड कोसळून धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तरी त्यांचा सर्वे करून धोकादायक वस्ती च पुनर्वसन करावेत यावे अशी मागणी समाजाकडून हो तो आहे लक्ष्मण शेळके वैभववाडी शासनाकडे. केली आहे.

तांडा वस्ती सुधार योजनेतील लोकसंख्या ची अट. न लावता धनगर समाजाला तांडा वस्ती सुधार योजनेचा लाभ मिळावा असा प्रश्न विधान सभेत मांडून धनगर समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या बाबत धनगर समाज आपला आभारी आहे असेही लक्ष्मण शेळके यांनी निवेदनात नमूद केले आहे.

वैभववाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!