भजन स्पर्धेमध्ये निरवडे येथील बुवा गौरी पारकरची बाजी

सावंतवाडी : महाराष्ट्र कामगार कल्याण यांच्या विद्यमाने नुकत्याच २९ आणि ३० जानेवारी २०२३ रोजी झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या भजन स्पर्धेमध्ये सावंतवाडीची बुवा तथा निरवडे गावची गौरी बाबू पारकर हिने पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध केली. तिने तिसऱ्या क्रमांकाची बाजी मारली.
गौरी पारकर ही सावंतवाडी येथील निरवडे गावची एक सर्वसामान्य शेतकरी घरातली मुलगी आहे. तिला लहानपणापासून गायनाची आवड असल्यामुळे तिने बुवा विजय माधव यांच्याकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. तिसेच तिच्याबरोबर तिचा भाऊ तथा पखवाजवादक सहदेव पारकर याने आनंद मोर्ये यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे घेतले.हे धडे घेतल्या नंतर या दोघांनीही भजन करायला सुरुवात केली. त्या दोघांचेही शालेय शिक्षण मळगांव इंग्लिश स्कूल,मळगांव येथे तर महाविद्यालयीन शिक्षण राणी पार्वतीदेवी ज्यूनियर कॉलेज सावंतवाडी येथे झाले. तसेच झान्जवादक असलेली तिची बहिण अंकिता बाबु पारकर हिनेही खूप मोलाची साथ दिली. तिच्या दोन काकी सावित्री पारकर व रोहिणी पारकर यांनीही तिला भजनात खुप मोलाची साथ दिली आहे.
तिचे काका लक्ष्मण सहदेव पारकर हे एक भजनी बुवा असल्यामुळे तिला त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. काका लक्ष्मण यांच्याकडुन तिला ही कला अवगत झाली. काकांचा हा वारसा गौरी ही पुढे चालवत आहे. तसेच बांदा- पडवे माजगांव येथील विजय माधव यांच्या शिष्या कु. चैताली देसाई, वैशाली देसाई सौ. संजना देसाई, ईशा पवार, सुहासिनी देसाई या सर्वांनी कोरस म्हणून तिला खुप मोलाची साथ दिली आहे.सध्या गौरी ही शास्त्रीय संगीताचे धडे संगीत अलंकार सौ वीणा दळवी यांच्याकडे घेत आहे. दरम्यान गौरी हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तसेच भजनी बुवा गौरी हिला पखवाज विशारद कु. प्राजक्ता परब हिनेही खुप मोलाची साथ दिली आहे. प्राजक्ता परब हिचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी

error: Content is protected !!