नेरूर येथे विठ्ठल रखुमाई व गोपाळ बोधस्वामी यांच्या पालखीचे आगमन
कुडाळ : नेरूर येथे विठ्ठल रखुमाई व गोपाळ बोधस्वामी यांच्या पालखीचे आगमन नेरूर देसाईवाडा येथील प्रदीप देसाई यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन झाले. रात्री ८ वाजता कीर्तन आरती, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता आरती आणि दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आला. बुवा नाना मळगावकर यांनी कीर्तन सादर केले. तर हार्मोनियमवर साथ करणारे म्हापणकर गुरुजी आणि तबलावर साथसंगत करणारे पाटकर गुरुजी यांचे विशेष सहकार्य लाभले. अनेक भक्तगणांनी पालखीचे दर्शन घेतले कीर्तन सेवेला सुद्धा अनेक लोकांची उपस्थिती होती. तसेच दुसऱ्या दिवशीच्या महाप्रसादाला सुद्धा अनेक भाविकांनी हजेरी लावली. प्रदीप देसाई यांनी चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध असा कार्यक्रम झाला असे त्यांनी सांगितले. काल सायंकाळी साडेचार वाजता पालखीचे पुढील परिक्रमा करण्यासाठी बाव या गावच्या दिशेने प्रस्थान झाले.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ