नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आंबडोस येथे स्वच्छता अभियान

मालवण : महाराष्ट्र भूषण डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, तालुका-अलिबाग, जिल्हा-रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण आ. ति . डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आंबडोस स्मशानभूमी व दुतर्फा रस्ता स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छ्ता अभियानात श्री बैठक मालवण व श्री बैठक चिंदर या बैठकीतील सुमारे १५० सदस्यांनी सहभाग घेतला. सुमारे १.५ टन कचरा साफ करण्यात आला आदरणीय ति. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यामार्फत याआधी ही आबडोस गावातील विहीर स्वच्छ्ता अभियानाचा भाग राबविण्यात आला होता. सदर स्वच्छ्ता अभियानास सरपंच सुबोधिनी परब व माजी सरपंच दिलीप परब, विष्णू परब, धोंडी नाईक भेट दिली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, मालवण

error: Content is protected !!