आ.नितेश राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेत सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज्याने मानले आभार.

जात पडताळणी उपाध्यक्ष श्री.पावरा यांची बदली करण्यासंदर्भात अधिवेशनात विधले लक्ष.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत उठवीला आवाज.
कणकवली/मयुर ठाकूर
सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने माननीय आमदार श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व सिंधुदुर्ग जिल्हा माजी अध्यक्ष मा. श्री.संदेशजी उर्फ गोट्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मा. आदिवासी मंत्री श्री. विजयकुमार गावीत यांना सूचित करून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे संदर्भात पावसाळी अधिवेशनात समाजाचा जात पडताळणी चा महत्वाचा प्रश्न हाताळला.
यावेळी आदिवासी मंत्री यांना जात पडताळणी उपाध्यक्ष श्री. पावरा यांची बदली करेबाबत सांगितले.
यासाठी समाजाच्या वतीने साहेबाचे आभार व्यक्त केले.
यावेळी वेळी जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष श्री. भगवान रणसिंग, जिल्हा कार्याध्यक्ष श्री निलेश ठाकूर, जिल्हा सचिव श्री दिलीप मस्के, जिल्हा उपाध्यक्ष तथा कणकवली तालुका अध्यक्ष वैभव ठाकूर, मालवण तालुका अध्यक्ष रुपेश गरुड, तसेच सुधीर गंगावणे, साईनाथ यादव, अचुत मसके, उमेश ठाकूर, विवेक गंगावणे, सचिन ठाकूर, अविनाश ठाकूर, सुनील ठाकूर इत्यादी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.