बाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ नये !

कुडाळ-वेंगुर्ले जेसीबी युनियनच्या बैठकीत निर्णय

कुडाळ : बाहेरील जेसीबीधारक आपल्या तालुक्यात येऊन काम करतात. त्यामुळे आपल्या स्थानिकांचा रोजगार कमी झाला आहे. स्थानिक तरुण आणि जेसीबीधारकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युनियनचे प्राधान्य असून ग्राहकांनी बाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ नये. याबाबत स्थानिकांना प्राधान्य देऊन सहकार्य करावे, असे कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी युनियनच्या झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी युनियनची बैठक नुकतीच वायंगणी येथे पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. कामाचे दर सर्वत्र सर्वांसाठी एकत्र ठरलेला आहे. 

आज बाहेरील जेसीबीधारक आपल्या तालुक्यात येऊन काम करतात. त्यामुळे आपल्या स्थानिकांना रोजगार मिळत नाही. याबाबत ग्राहकांनी तालुक्यातील जीसीबींना प्रथम प्राधान्य द्यावे, असे ठरविण्यात आले. यावेळी युनियन अध्यक्ष नीलेश सामंत, उपाध्यक्ष अनिल नाईक, सचिव आप्पा गावडे, सल्लागार आबा करमळकर, आनंद तांडेल, स्वप्निल गडेकर, सदस्य यशवंत धुरी, विक्रांत नाईक, सौरभ नाईक, विनोद कुडाळकर, प्रदीप दळवी, विलास दळवी, नारायण तांबोसकर, रंगनाथ गावडे, संतोष गावडे, शरद मोबारकर, संजू आरोलकर, रोहन मेस्त्री, दर्शन ठाकूर, रवींद्र आजगावकर, श्रीधर पंडित आदी उपस्थित होते. 

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ 

error: Content is protected !!