सावंतवाडी तालुक्यात पावसाच्या थैमानामुळे पडझडीच्या घटना सुरूच

आरोंदाठिकाणी घरावर पडले झाड
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यात पावसाच्या थैमानामुळे पडझडीच्या घटना सुरूच आहेत. बुधवारी पहाटे आरोंदा येथील कोशेसाॅव डाॅमनिक फर्नाडिस यांच्या घरावर आंब्याचे झाड पडुन नुकसान झाले. फर्नांडिस हे कामानिमित्त मुंबईला असतात मात्र या घरात काही भाडेकरू राहत होते. मात्र, स्लॅबचे घर असल्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र घराच्या सज्जाचे व इतर भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती आरोंदा ग्रामसेवक सतीश राणे यांनी दिली.
दरम्यान, तालुक्यात अन्य भागातही काही प्रमाणात पडझड सुरूच आहे. सावंतवाडी जूनी पंचायत समितीच्या मागील भागात असलेली जांभ्या दगडाची संरक्षक भिंत कोसळली असून ती हटवण्याचं काम सुरू आहे. पुरामुळे वाफोली येथे बागायती चे नुकसान झाले आहे.





